• Mon. Jun 5th, 2023

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होळी साध्या पद्धतीने साजरी करा-महापौर

अमरावती : महाराष्ट्रात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणारी होळी यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे.
कोविडच्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशयसाधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेलानसून सध्या अमरावती शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे.त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी २८ व २९ मार्च रोजी चाहोळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनीकेले आहे.यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर केल्या आहेत. यामध्ये होळीचा सणसाजरा करताना मोठ्या प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणेतसेच यामुळे होणार्‍या वायुप्रदूषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये.धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिकठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारेगर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवामिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन केले आहे.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यासअथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांशविरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापनअधिनियम, २00५ मधील कलम ५१ ते ६0, साथरोग नियंत्रण अधिनियम, १८ ९ ७ व भारतीयदंडसंहिता, १८६0 मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *