• Sun. May 28th, 2023

कोरोनाचा कहर लाकडाऊनचा जहर

ByGaurav Prakashan

Mar 9, 2021

कोरोना व्हायरस आला व लोकांच्या उरावर बसला. तो काही जाण्याची इच्छाच करीत नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. कारण कोरोनानं लोकांच्या मनात भीतीयुुक्त वातावरण तयार केलं आहे.कोरोना येवून दिड वर्ष झाला. त्याचेवर औषधीही निघाली. सर्वत्र लसीकरण होत आहे.. तरी कोरोना आता नव्या रुपात आलाय असंच वाटत आहे. कोरोनाच्या या पाश्वभुमीवर कोरोनाचा कहर व लाकडाऊनचा जहर असे म्हणायची वेळ आली आहे.लाकडाऊन म्हणजे लोकांना उपासाने मारण्याचे एक साधन बनले आहे. कारण मागे जेव्हा लाकडाऊन लागलं होतं. त्यावेळी देशाची स्थिती अशीच होती.
मागे लाकडाऊन जेव्हा लागलं होतं. त्यावेळी लोकांंनी घरात स्वतःला बंदीस्त केलं होतं. जोही कोणी बाहेर दिसत असे. त्याला पोलिस मंडळी लाठीने मारत असत. त्यामुळं कोणीही बाहेर पडायला धजत नव्हता. त्यातच काही दिवस उपासातही काढावे लागले होते. शिवाय लाकडाऊन संपल्यावर सरकारनंही लोकांना सोडलं नाही. त्यांनी मनमानीप्रमाणे लोकांच्या हाताला काम नसूनही वीज बिल व. नळाचं बिल पाठवलं. त्यातच ज्यांनी कुणी कर्ज उचललं होतंं. त्यात्यात थोडीशीही सवलत दिली नाही. बँकांनी पुरेशी सवलत न देता आपले पैसे वसूल केले. त्यात सरकारनंही हात वर केले. ही अवस्था सरकारमुळं झाली असली तरी त्यास आम्ही जबाबदार नाही असं सरकारचं म्हणणं होतं. आजही तसंच म्हणणं आहे. म्हणून कोरोना कहर जरी ओतत असला तरी तो सामान्य लोकांना कहर वाटत नाही. तसेच लाकडाऊन या कोरोनावर मात करण्याचा उत्तम पर्याय असला तरी तो लोकांना पटत नाही. अगदी ते लाकडाऊन लोकांंना आज जहरच वाटत आहे.
आज तशी वेळ नाही की लाकडाऊनमध्ये लोकं घरी बसतील. कारण आता लोकांना माहित आहे की आम्ही जरी घरी बसलो तरी सरकार आम्हाला सोडणार नाही. पुरेशी सवलत देणार नाही. वीज बिलाचे व नळाचे शुल्क कमी करणार नाही. कर्जाच्या हप्त्यातही पुरेेशी सवलत देणार नाही. एवढंच नाही तर आमची लेकरंही सरकार पोसणार नाही. वेळ पडल्यास आत्महत्येची वेळ येवू शकते. म्हणूनच कितीही लाकडाऊन लागो वा तो कितीही कडक असो. लोकं रस्त्यावर पडू लागले आहेत. त्यांच्या मनातून कोरोनाची भीती थोडीशी कमी झाली आहे. जरी कोरोना रुग्णांंची संख्या वाढत असली……..जरी पोलिसांच्या लाठ्या पडत असल्या तरी रस्त्या रस्त्यावर आपल्याला भीडत दिसते आहे.
या कोरोनाच्या महामारीत देशाजवळ पैसा नाही. मुद्राफितीचे दर कमी झालेले आहे. बँका डबघाईला आल्या आहेत. आपलेच पैसे आपल्याला द्यायला बँका कुचराई दाखवत आहे. पेट्रोल तसेच सिलेंडरचे दर आसमानात चढले आहेत. त्यातच पुर्वी जेवढे दिवस सिलेंडर चालायचा. तेवढे दिवस आता सिलेंडर चालतांना दिसत नाही.
एकंदर सांगायचं झाल्यास कोरोना कितीही आग ओकत असला आणि लाकडाऊन कितीही त्यावर अमृत असलं तरी ते जहरच वाटत असून लोकं ते अमृत पचवायला तयार नाहीत. त्याला जहरच समजत आहेत. त्यांना आता आपल्या मृत्यूची पर्वी उरलेली नाही. ते विचार करीत आहेत की एक ना एक दिवस जायचेच आहे पृथ्वीतलावरुन. त्यात काय एवढं घाबरायचं. म्हणूनच ते बाहेर पडत आहेत आणि कोरोनाही एक पाऊल पुढेच चालत आहे मागे पाय सिकुडता न घेता……..

    अंकुश शिंगाडे,

    नागपूर
    ९९२३७४७४९२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *