• Sun. Jun 4th, 2023

कृषी-ग्रामविकास, आरोग्यसेवांसाठी मोठी तरतूद

ByGaurav Prakashan

Mar 9, 2021

मुंबई : राज्याचा २0२१-२२ या आर्थिक वर्षाचा १0,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. कोरोनामुळे चव्हाट्यावर आलेल्या आरोग्य व्यवस्थेतील दोष दूर करण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. कृषी-ग्रामविकास आणि आरोग्यसेवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली. जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयांबरोबरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जाणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारकडून राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणाही करण्यात आली आहे.
मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत
स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असले पाहिजे, असे पवार म्हणाले. राज्यातील परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्‍वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी दिला जाणार असून, जेजुरीगडासाठी, सांगलीतील बिरुदेव देवस्थानाच्या विकास आराखड्यासही निधी देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला जाणार. नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी त्याचबरोबर बसवेश्‍वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार. पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी देऊ अशी घोषणा पवार यांनी केली.
शेतकर्‍यांना शून्य व्याजदराने कर्ज
तीन लाख रुपयांपयर्ंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणा?्या शेतक?्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही अजित पवार यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५00 कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार. लातूरच्या रुग्णालयाच्या बारुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी देणार. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. आरोग्य विभागास यंदा २९00 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *