मुंबई: राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे. कुटुंबाचा विरोध पत्करुन प्रियांका राजवीरशी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या लग्नापूर्वीच्या मंगलकार्याला सुरुवात झाली आहे. परंतु, अंकुशराव पाटील यांना हे लग्न मान्य नसल्यामुळे ते या मंगलकार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रियांका आणि राजवीरच्या लग्नाची खबर अंकुशरावापयर्ंत पोहोचू नये यासाठी राजवीरच्या मित्रांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. लग्नमंडपाच्या चहुबाजूने मुलांनी कडक पहारा ठेवला आहे. परंतु, या लग्नाची खबर अंकुशरावापयर्ंत पोहोचावी यासाठी काकी तशी व्यवस्था करते आणि ऐन लग्नात अंकुशराव मंडपात पोहोचून या लग्नाला विरोध करतो. इतकंच नाही तर प्रियांकाला हात धरुन घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, या सगळ्या प्रकार पोलीसही घटनास्थळावर पोहोचतात आणि प्रियांकादेखील राजवीरची बाजू घेत वडिलांसोबत घरी जाण्यास नकार देते. अखेर सर्व अडचणींवर मात करून राजवीर आणि प्रियांकाचा विवाह सोहोळा संपन्न होतो.
कारभारी लयभारी! राजवीर-प्रियांकाचा लग्नसोहळा
Contents hide