• Mon. Jun 5th, 2023

कारची दुचाकीस धडक, १ ठार

ByGaurav Prakashan

Mar 10, 2021

तिवसा : दिवसा पोस्ट हद्दीतील धारवाडी वळण रस्त्यावर अमरावतीकडे भरधाव वेगात जाणार्‍या बीएमडब्ल्यू कार क्रमांक सीजी0४/ एमएम-६६0६ ने दुचाकी क्र, एमएच-२७/ सीबी-८४१२ला जबरदस्त धडक दिल्याने बबलू उर्फ योगेश अंबादास यादव ४२ राहणार भारवाडी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार शसकडून गावी भारवाडी जात असताना महामार्ग वळण रस्त्यावर कारणे जबरदस्त धडक दिली. यामध्ये यादव यांचा जागीच मृत्यू झाला तर कारसह दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले. बबलू यादव सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व असून तीवसा कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संस्थेचे माजी संचालक होते व ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी राजकरणात सुद्धा नेहमी सहभाग राहत होता. अपघाताचे वृत्त कळताच शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली प्रकरणी तिवसा पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन ३0४ कलमं नुसार अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *