मुंबई : राज्यातील असंघटित, तसेच दुर्गम भागातील कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाअभियान लवकरच हाती घेणार असल्याचे कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी सांगितले.असंघटित व दुर्गम भागातील कामगारांना अनेकदा कामगार कल्याण योजनांचा लाभ मिळत नाही. हे लक्षात घेऊन विविध कामगार कल्याण योजनांची सांगड घालून महाअभियान हाती घेण्यात येईल. त्याद्वारे शासनाच्या योजना थेट कामगारांच्या दारी पोचविल्या जातील.
त्यासाठी वाडी,वस्ती व पाड्यावरदेखील अभियान राबविण्यात येईल. घरेलू कामगार, इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. हा दुर्लक्षित घटक असून त्यांची मिळकतही कमी असते. त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना एकत्रित करण्यात येतील व योग्य लाभार्थ्यांपर्यत पोहचविल्या जातील. लवकरच हे अभियान हाती घेणार असल्याचे राज्यमंत्री श्री.कडू यांनी सांगितले.
कामगार कल्याण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाअभियान – राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू
Contents hide