• Mon. Jun 5th, 2023

कपिल देव यांनी टोचून घेतली कोरोना लस

ByGaurav Prakashan

Mar 4, 2021

नवी दिल्ली : दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी बुधवारी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यापूर्वी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मोठय़ा नेत्यांना ही लस घेतली आहे. कपिल देव यांच्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही लस टोचून घेतली. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये, कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली.

महान फुटबॉलपटू पेलेनेही घेतली कोरोना लस
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी मंगळवारी कोरोनाची लस घेतली. यानंतर त्यांनी, हा दिवस कधीही विसरला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
ब्राझीलचे ८0 वर्षीय महान फुटबॉलपटू पेले यांनी लस घेतानाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या उजव्या हाताला लस टोचण्यात आली. दरम्यान, तीन वेळा विश्‍वविजेती ठरलेल्या ब्राझील संघाचे सदस्य राहिलेले पेले यांनी कोणत्या कंपनीची लस घेतली, याचा खुलासा मात्र केलेला नाही.
जगभरासह ब्राझीलमध्ये मागील एक वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. साओ पाऊलामध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढलेला होता. यामुळे पेले आपल्या घरीच होते. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पेले यांनी, हा दिवस कधीही विसरला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *