मुंबई : मुलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन व त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांच्या सकारात्मक वाढ आणि विकासाचा एक महत्वपूर्ण अंग आहे. शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रातील शाळकरी मुलांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून आयोजित गोष्टींचा शनिवार या कथा वाचनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) युनिसेफ आणि प्रथम बुक्स स्टोरी वेव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला.
महाराष्ट्रातील मुलांकरिता शाळाबंदीच्या कालावधीत विस्तार झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच त्यांच्या भाषा कौशल्यात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने पूरक असा गोष्टींचा शनिवार हा उपक्रम गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे. या कार्यक्रमात २.६ लाख शिक्षक आणि अंगणवाडी सेवक, राज्यभरातील एक लाख शाळा आणि अंगणवाडयांनी सहभाग घेतला. याचा राज्यातील २५ लाख मुलांनी लाभ घेतला. ह्यआनंद आणि भाषा कौशल्यासाठी वाचन या विषयावर पॅनल चचेर्चेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे परिणाम व प्रभाव, टिकाव आणि क्षेत्रातील विविध प्रक्रिया असलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. युनिसेफचे शिक्षण प्रमुख टेरी डूरनियान यांच्या मते, ज्या ठिकाणी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचे आहे, अशा शाळेपूर्व व शाळेतील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या कामाला एनएपी २0२0चा एक अंग असलेले फाउंडेशन लिटरसीद्वारे प्राधान्यक्रम दिले जात आहे. राज्याला पूर्णपणे मदत करण्यसाठी युनिसेफ कटिबद्ध असून हा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी आणि या अभियानांतर्गत मुलांना रोचक अश्या पुस्तके फक्त शनिवारचा नव्हे, तर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी शाळेत किंवा घरात उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रयत्न सुरु राहतील. एकदा जर विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य विकसित झाले तर ते स्वत: आयुष्यभर शिकत राहतात. प्रथम बुक्सच्या अध्यक्षा सुजेन सिंग म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत वाचन कौशल्य आणि भावनिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी कथा पुस्तके महत्त्वपूर्ण ठरतात. आमच्या वाचन कार्यक्रमांतर्गत आम्ही विविध विषयांवर असलेल्या ग्रेड-योग्?य संकल्पना मुलांना देऊ इच्छितो. आम्ही एससीईआरटी, आय सी डी एस आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ञ आणि स्वयंसेवक यांचे आभारी आहोत की त्यांनी उत्तम नेटवर्क उपलब्ध करून दिला आणि सदर पुस्तकांच्या प्रसारासाठी खूप मदत केली. यामुळे अशा आव्हानात्मक वेळी ही पुस्तके मुलांपयर्ंत पोहोचवणं शक्य झाल.
Related Stories
October 2, 2023
October 2, 2023