• Tue. Jun 6th, 2023

कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये-मुख्यमंत्री

ByGaurav Prakashan

Mar 14, 2021

मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर सुमारे चार महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठय़ा प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या चार महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.
मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परीवारांतल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले (पान ६ वर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *