• Thu. Sep 28th, 2023

कंगनाला नेटकरी म्हणाले, हा तर बॉडीसूट!

ByGaurav Prakashan

Mar 23, 2021

मुंबई : बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगना रणौत गेल्या काही महिन्यांपासून विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा कंगनाने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे.सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिची चर्चा होत आहे.दरम्यान फोटो पाहून नेटिझन्स तिला वजन कमी करण्यासाठी टिप्स मागत आहेत. तर काहींनी तर बॉडीसूट आहे असे कमेंट्स करताना दिसत आहे. कंगनाचा हा अंदाज निराळा आहे.. मग तिचा रोल असो किंवा त्या रोलसाठी तिची फॅशन स्टेटमेंट.. तिची प्रत्येक अदा लक्ष वेधून घेते. प्रत्येक सिनेमात कंगनाच्या लूकनं फॅन्सची मनं जिंकलीत. आगामी ‘थलैवी’ सिनेमासाठी तिने बरीच मेहनत घेतलीय. जयललिता यांच्या लूकप्रमाने तिचे लूक करण्यात आले आहेत. यातलेच निवडक लूक तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. मात्र नेटिझन्सना तिचा ह लूक काही आवडला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कंगना ट्रोल होत आहे. विचित्र कमेंट्स करत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
थलैवीचा ट्रेलर लाँच होण्यास अजून एक दिवस बाकी आहे. या बायोपिकसाठी काही महिन्यांत २0 किलो वजन वाढविणे आणि नंतर काही दिवसांत ते कमी करणे हे माज्यासमोर खूप मोठे आव्हान होते.प्रचंड मेहनत घेत हे लूक मिळवले असल्याचे कांगणाने सांगितले.त्यामुळे ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच कंगणा चर्चेत आहे. ट्रेलर पाहण्यासाठी उस्तुकता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!