बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याचा “राधे योर मोस्ट वांटेड भाई’ सध्या चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करुन याच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट ईदच्या दिवशी १३ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आता चित्रपटाचे ट्रेलर पाहण्यासाठीदेखील सलमानच्या चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही.
माहितीनुसार, चित्रपटाचे ट्रेलर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीज केले जाऊ शकते. ट्रेलर आधी मार्चमध्ये रिलीज केले जाणार हाेते. मात्र आता याला रिलीजच्या एका महिना आधी एप्रिलमध्ये लाँच केले जाऊ शकते. सूत्रानुसार…, ट्रेलरमध्ये सलमानची संवादफेकी आणि संदीप हुड्डा आणि दिशा पाटनीचा शैलीदेखील धमाकेदार दिसणार आहे.
एप्रिलमध्ये रिलीज होणार सलमान खान अभिनीत ‘राधे’चे ट्रेलर
Contents hide