• Mon. Jun 5th, 2023

एका छोट्याशा गावातील दारू दुकानाची ५१0 कोटींची बोली.!

ByGaurav Prakashan

Mar 9, 2021

हनुमानगढ : राजस्थानमधील एका छोट्याश्या गावातील दारुचे दुकान सध्या सर्वत्र चर्चेत आहे. हे दुकान चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे या दुकानाचा लिलाव करण्यात आला असून त्याला काही शे कोटींची बोली लावण्यात आली. राजस्थानमधील हनुमानगढ येथील दारुच्या या दुकानाला ५१0 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आणि लिलाव पूर्ण झाला. होय तुम्हाला वाचून धक्का बसला असेल पण हे दुकान खरोखर ५१0 कोटींना विकले गेले आहे. या दुकान एकाच कुटुंबातील दोन महिलांनी विकत घेतले आहे.
दुकानासाठी सकाळी ११ वाजता लिलाव सुरु झाला आणि तो तब्बल १२ तासांहून अधिक म्हणजेच मध्यरात्रीनंतरही सुरु होता. काही लांखांपासून सुरु झालेली ही बोली अगदी दुसर्‍या दिवशी रात्री दोन वाजता म्हणजेच १५ तासांनंतर संपली. ७२ लाखांपासून या दारुच्या दुकानाचा लिलाव सुरु झाला. १५ तास चालेल्या या लिलावामध्ये प्रत्येकजण एकाहून एक वरचढ बोली लावत होता. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार यापैकी एका महिलेचे नाव किरण कनवार आहे. सध्या राजस्थानमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून सामान्यपणे दारुच्या दुकानांचा लिलाव करण्यात येतो. याच लिलावाचा भाग म्हणून या दुकानावर बोली लावण्यात आली आणि त्याला तब्बल ५१0 कोटींची किंमत मिळाली. एवढी मोठी किंमत या दुकानासाठी मिळेल असे विभागाच्या अधिकार्‍यांनाही वाटले नव्हते. त्यामुळे ही रक्कम ऐकून अनेकांना आश्‍चयार्चा धक्का बसला. मागील वर्षी या दुकानाला लिलावामध्ये ६५ लाखांची किंमत मिळाली होती म्हणून यंदा ७0 लाखांपासून या दुकानाचा लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा लिलाव संपल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पुढील हलचाली सुरु केल्या आहेत. कनवार कुटुंबियांना या दुकानाच्या किंमतीच्या दोन टक्के रक्कम तातडीने उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. राजस्थानमध्ये दारुच्या दुकांनांचा लिलाव ही समान्य गोष्ट आहे. सध्या व्हचरुअल बिडिंगच्या माध्यमातून सात हजार ६६५ ठिकाणी लिलाव सुरु आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही लिलाव पद्धत बंद केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *