चांदूर रेल्वे : विज तोडणी थांबविण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणे नंतरही मंगळवारी धामणगाव मतदार संघात विज तोडणी सुरूच होती. त्यामुळे आ. प्रताप अडसड सदर मुद्दावर विधानसभेत आक्रमक झाले होते. त्यांनी विज तोडणी त्वरीत थांबविण्याची मागणी केली.वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात मंगळवारी गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली.
सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.असे असतांनाही धामणगाव मतदारसंघात अद्यापही विज कपात केल्या जात असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सभागृहात अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिले. उपमुख्यमंञी अजित पवार यांनी विज कट करण्याबाबत सभागृहात स्थगिती दिल्याची माहिती दिली.परंतु याऊलट धामणगाव रेल्वे मतदारसंघात विज कपात संबंधी वादाची भूमिका निर्माण झाली असल्याने याबाबत त्वरित लक्ष द्या अशीही मागणी आमदार प्रताप अडसड यांनी सभागृहात केली.तर नागरिकांना विज कपात संबंधित काही अडचणी असल्यास त्यांनी व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करण्याचे केले आवाहन आ. अडसड यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही धामणगाव मतदार संघात वीज तोडणी सुरूच !
Contents hide