कमी भांडवलात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि चांगला परतावा देणारा व्यवसाय म्हणून काजू प्रक्रिया उद्योगाचा उल्लेख करावा लागेल. कारकिर्दीच्या दृष्टीने तुम्ही या व्यवसायाचा विचार करु शकता. काजूच्या फळाला ‘कॅश्यू अँपल’ म्हणतात. या फळापासून फेणी, सरबत, स्क्वॅश, वाईन आदी पदार्थ तयार करतात. काजूच्या फळाच्या खालील बीमध्ये काजू असतात. काजूगरावरील टरफलात ‘कॅश्यूनट शेल लिक्वीड’ हे तेल असतं. ते ऑईलपेंट किंवा लाकडाच्या पॉलीशमध्ये वापरलं जातं. टरफल काढून काजू मिळवण्यासाठी बरीच प्रक्रिया करावी लागते. झाडावरून काढलेलं दमट बी कडक उन्हात वाळवलं जातं. त्यानंतर स्टीमरमध्ये ठराविक तापमानाची वाफ ठराविक दाबाने सोडून २0 मिनिटांसाठी वाफवलं जातं. वाफवल्यावर बी ड्रायरमध्ये वाळवलं जातं. वाळवलेलं बी कटरद्वारे फोडून गर वेगळा काढला जातो. चार किलो काजू बी पासून एक किलो काजू मिळतात. पापुद्रय़ाचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. टरफल भट्टीमध्ये इंधन म्हणून वापरता येतं, त्यापासून तेलही काढता येतं. काजूपासून विविध स्वादांचे काजू तयार करता येतात. सर्व खर्च वजा जाता एका किलोमागे साधारणपणे २५ रूपयांचा नफा मिळू शकतो.
उत्तम नफ्याचा प्रक्रिया उद्योग
Contents hide