आलियाची नवी झेप

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या गंगूबाई काठियावाडी या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या सिनेमाचा टीझर लॉन्च झाल्यानंतर अनेकांनी आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं. तर काहींनी या भूमिकेसाठी आलियाची निवड योग्य नसल्याचं म्हंटल. असं असलं तरी आलियाने अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारात तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अभिनयात लोकप्रियतेचं शिखर गाठल्यानंतर आता आलिया भट्ट एका नव्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीय. आलियानं स्वत:च प्रोडक्शन हाउस सुरु केलंय. इटरनल सनशाइन प्रोडक्शन असं तिच्या प्रोडक्शन हाउसचं नावं आहे. आलियाने कंपनीचा लोगो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने शेअर केलेल्या लोगोमध्ये कंपनीच्या नावासोबत मांजरीचं काटरून आहे. आलिया प्राणीप्रेमी असल्याचं तिच्या लोगोवरुन लक्षात येतंय. मला प्रोडक्शन हाउसची घोषणा करताना आनंद होतोय. चला आम्हाला काही कथा सांगू द्या, काही आनंदी, काही उबदार, काही सत्य कथा अशा आशयाचं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. येत्या काळात आलिया अभिनयासोबत निर्माती म्हणूनही सिनेसृष्टीत तिचं नशीब आजमवणार आहे.

२0१९ सालात आलियानं एक जागा खरेदी केली होती. यावेळी आलिया नव्या ठिकाणी राहायला जाणार अशा चर्चा रंगत होत्या. आलियानं ही जागा तिच्या ऑफिससाठी घेतल्याचं सांगितलं होतं. आलियाने जुहू इथं तिचं नवं ऑफिस सुरु केलं आहे. प्रोडक्शन डिझायनर रुपीन सूचक यांनी आलियाच्या नव्या प्रोडक्शन हाउसच्या ऑफिसची सजावट केलीय. रुपीन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आलियाच्या ऑफिसचे फोटो शेअर केले आहेत. उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याची खरं तर आलियाची ही पहिली वेळ नाही. याआधी आलियाने लहान मुलांसाठी फॅशन लाईन सुरु केली आहे.