• Mon. Jun 5th, 2023

‘आमच्या मुलीची बदनामी केली जातेय, आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही’

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अशा अनेक विषयांवर ते यावेळी बोलले आहेत. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी पूजाच्या आई-वडिलांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले.
पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली आणि त्यांना एक पत्र दिले आहे. त्यांनी पत्र लिहित महाराष्ट्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तपास करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तसेच कुटुंबाची बदनामी केलीय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘7 फेब्रुवारीची पूजाचा मृत्यू झाला. कोणत्याही आई-वडिलांसाठी आपल्या मुलीचा मृत्यू वेदनादायी असतो. मुलीच्या मृत्यूपेक्षा जास्त त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे, माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात जी चर्चा होत आहे ती आहे. मुलीच्या मृत्यूचा संबंध संजय राठोड यांच्याशी लावला जात आहे. हे अत्यंत निराधार आहे. आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही. तिच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. तपासामध्ये कोणीही दोषी असल्यास कठोर शिक्षा द्यावी. आमच्या मुलीचा बळी गेला, मात्र केवळ संशयावरून कुणाचाही बळी जाऊ नये, त्यांचा राजीनामा घेण्याची आम्ही मागणी केलेली नाही. राजकारण किंवा दबावामुळे घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. राठोड हे आमच्या समाजातून खूप संघर्षातून इथपर्यंत आले आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *