आता चोवीस तास लसीकरण-आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढाईला आणखीन वेग देण्यासाठी लसीकरण मोहिमेतील वेळेची र्मयादाही सरकारने संपुष्टात आणली आहे. आता नागरिक आपल्या सुविधेनुसार, दिवसातील २४ तासांत कोणत्याही वेळेस लसीकरणासाठी वेळ निश्‍चित करू शकतात. दिवसा आणि रात्रीही लसीकरणाची सोय उपलब्ध राहणार आहे. याची घोषणा खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकारन्े वेळेची र्मयादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता चोवीस बाय सात आपल्या सुविधेनुसार लसीचा डोस घेऊ शकतात. पंतप्रधान देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणून आहेत. वेळेची ही सुविधा आता सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांना लागू होईल, असे ट्विट आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. कोरोना लसीकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या कोविन पोर्टलवर आणि मोबाईल अँप्लिकेशनवर सरकारी आणि खासगी रुग्णालये जोडण्यात आलेली आहेत. अशावेळी वेळेची कोणतीही र्मयादा नागरिकांच्या लसीकरणात अडथळा ठरणार नाही.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कोविन पोर्टलवर ९ ते ५ अशी कोणतीही लसीकरणाच्या वेळेची र्मयादा नाही. रुग्णालयांकडे त्यांना जेव्हापर्यंत लसीकरण सुरू ठेवायचे असेल तेव्हापर्यंतचा पर्याय उपलब्ध आहे. रुग्णालये रात्री ८ वाजल्यानंतरही लसीकरण मोहीम राबवू शकतात. आपल्या क्षमता आणि शेड्युलसाठी त्यांना राज्य सरकारशी संपर्क साधावा लागेल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी म्हटले.
कोरोना लसीकरण केंद्रांवर दिसून येणारी गर्दी हीदेखील वेळेची र्मयादा संपुष्टात आणण्यामागचे एक कारण आहे. रुग्णालयाच्या क्षमतेनुसार, वेळ निर्धारित केली जाऊ शकते. मग ते सकाळी असो, दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वेळा निधार्रित करू इच्छित नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयांत गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे यंत्रणेत थोडा बदल करून लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, असेदेखील भूषण यांनी स्पष्ट केले. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आल्यानंतर १ मार्चपासून सुरू झालेल्या दुसर्‍या टप्प्यात ६0 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच गंभीर आजारांना तोंड देणार्‍या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.