मोर्शी:कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून जग थांबलेले आहे. अशातच शाळा सुद्धा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. नुकत्याच इयत्ता दहावी च्या बोर्डाच्या परीक्षा 29 एप्रिल पासून सुरु होणार आहे. त्यामुळे मुलांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत विद्यार्थी शाळेपासून व शिक्षकांना पासून दूर आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जनता गर्ल्स हायस्कूल शेंदुरजना घाट व वसंतराव नाईक हायस्कूल, जरुड यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रमशील शिक्षक अतुल पडोळे व सुषमा मानेकर यांच्या संकल्पनेतून “परीक्षेला जाता जाता…..” या उपक्रमाचे आयोजन केले आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे.
इयत्ता दहावीच्या भूगोल विषयातील संपूर्ण कृतीपत्रिकेवर मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री राजाराम वावरे सर, सांगली यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. कृतीपत्रिकेवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना कृतिपत्रिकेच्या बाबतीत सर्व शंका सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. कृतीपत्रिके वर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीपत्रिके वरील सर्व शंका सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. या आंतरजालावर डॉ. मायाताई हिवसे मॅडम, मुख्याध्यापिका जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट व मा. श्री डि.के. गोडबोले सर, मुख्याध्यापक, वसंतराव नाईक हायस्कूल, जरूड आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व तांत्रिक बाजू अतुल पडोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे परिचय सुषमा मानेकर यांनी दिला, तर आभार श्री यु एम काळे सर यांनी मानले.
आंतरजालाच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाचे मार्गदर्शन
Contents hide