मोर्शी : मोर्शी तालुक्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टरवरील संत्रासह खरीप पिके नष्ट झाल्यानंतर शेतकरी स्वत:हून सावरले होते. मधल्या काळात कीड-रोगामुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिके नष्ट झाली. मात्र शेतकरी या संकटांमधून सावरत रब्बीकडे वळला होता. मात्र आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मात्र अद्याप पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याने नुकसानीचा आकडा जास्त असण्याची शक्यता बळावली जात आहे. रब्बी हंगामातील संत्रा गहू व हरभरा ही पिके काढणीच्या अवस्थेत असतांना जोरदार वादळासह गारपीट अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभर्यासहित भाजीपाला, संत्रा, मोसंबी,अशा फळपिकांचा हानी झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना पंचनाम्याशिवाय भरपाई मिळत नाही. त्यामुळे महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावे.हवामान बदलाचा मोठा फटका शेतकर्यांना बसला असून मोर्शी तालुक्यातील काढणीस आलेल्या संत्रा, गहू, चना या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वातावरण अचानक ढगाळ होऊन जोरदार हवेसह आलेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे फळबागांनाही फटका बसला आहे. तालुक्यात चार दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली . वातावरण बदलामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चना, गहू, संत्रा मोसंबी, फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले . आता पुन्हा ४ दिवस हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. वातावरण बदलामुळे तीन दिवसांपासून रोज पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर््याचे रब्बीचे उत्पादन ५0 टक्क्यांनी घटणार आहे, प्रशासकीय अधिकार्यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन शेतकर्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Related Stories
September 28, 2023