अमरावती : अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबच संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी वरूड-मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे, बेलोरा विमानतळाला आवश्यक निधी, तसेच मोझरी, कौंडण्यपूर विकासासाठी निधीची तरतूद केलेला अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला असून, अमरावती जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी त्याद्वारे झाली आहे. याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, मोझरी, कौंडण्यपूर, संत्रा प्रक्रिया केंद्र आदी विविध बाबींसाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. जनसामान्यांच्या विकासाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून भक्कम पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रांना न्याय मिळवून देणारा हा अर्थसंकल्प आहे. अमरावती जिल्ह्यातील आतापयर्ंतच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. अर्थसंकल्पात स्पष्ट तरतूद झाल्याने अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण होणार आहे. नवीन शासकीय महाविद्यालयामुळे राज्यात वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर, विशेषज्ञ स्तरावरील ३ हजार जागा वाढणार आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग, रात्रीच्या विमानवाहतुकीची सुविधा यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध होणार असल्याने तेही काम पूर्णत्वास जाणार आहे. असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.
वरूड- मोशीर्साठी संत्रा प्रक्रिया केंद्रे
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी वरूड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहे.
मोझरी, कौंडण्यपूरसह लासूरचाही विकास
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, तसेच संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे मुलभूत निवासी आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात १0१ कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यातून दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
व्हीएमव्हीला १0 कोटी
अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी १0 कोटी रुपए निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांनाही चालना
अमरावती येथे प्रशासकीय इमारतींसह पायाभूत सुविधांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतींसाठी २५५.९६ कोटी रुपये तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ३६ कोटी, विभागीय आयुक्त कार्यालयासाठी ७६ कोटी, जिल्हास्तरीय इतर कार्यालयांसाठी ६0 कोटी, जिल्हा परिषदेसाठी ५८ कोटी, दयार्पूर तहसीलसाठी १३ कोटी व मोशीसाठी १२.९६ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे पालकमंत्री ठाकूर यांनी सांगितले.
महिला व बालविकाससाठी भरीव तरतूद
महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ३ टक्के नियतव्यय, राज्य राखीव पोलीस दलाचा पहिला स्वतंत्र महिला गट, तेजस्विनी योजनेत महानगरातील महिलांना प्रवासासाठी विशेष महिला बस, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेत गृहखरेदीची नोंदमी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत, ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपयर्ंत मोफत एसटी प्रवासासाठी राज्यव्यापी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना आदी अनेकविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
सर्वांगीण विकासाची ग्वाही
सामाजिक न्याय, कामगार, आदिवासी विकास, बहुजन कल्याण आदी सर्वच विभागांसाठी व समाजातील वंचित घटकांसाठी भरीव तरतूद करून या अर्थसंकल्पाद्वारे महाविकास आघाडी शासनाने सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज, विमानतळासह अनेक तरतुदी
Contents hide