अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

मुंबई : बॉलिवूडचे महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियावर अँक्टिव्ह असतात. ते नेहमी आपल्या प्रकृतीची माहिती आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी सध्या आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती एका पोस्टद्वारे दिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी गेल्या शनिवारी सोशल मीडिया आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. परंतु याबबात ठोस अशी माहिती मिळाली नव्हती. अमिताभ यांनी सध्या एक फोटो शेअर करून आपल्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या शस्त्रक्रियेनंतरचा पहिला फोटो अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून यात अमिताभ यांनी चष्मा देखील लावला आहे. या फोटोसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ह्यतुमच्या शुभेच्छांबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. या वयात डोळ्याची शस्त्रक्रिया करणं खूप नाजूक आणि कौशल्याचे काम आहे. या बाबतीत सर्वोत्तम उपचार मला मिळालेले आहेत. सध्या सगळं व्यवस्थित असल्याची मी आशा करतो आहे. माझी दृष्टी आणि बरे होण्याचा वेग जरा कमी आहे. त्यामुळे या फोटोमध्ये काही चुका होण्याची शक्यता आहे. याबद्दल मला समजून घ्या. याशिवाय जर सगळं व्यवस्थित पार पडले तर विकास बहलसोबत मी माझ्या नवीन चित्रपटासाठी काम करणं सुरु करू शकेन, ज्याचं नाव सध्या तरी गुड बाय असं आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन लवकरच आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ब्रह्मस्त्र आणि इम्रान हाश्मीसोबत चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटातही अमिताभ काम करत आहेत.