अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा देशातील २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
एशिया पोष्ट व फेम इंडियाच्या सर्व्हेत संसदेतील कामगिरीच्या आधारे खासदार नवनीत राणा यांनी स्थान पटकाविले. हा गौरव माझा नसून मला निवडून देणार्या तमाम मतदारांचा व माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पती आमदार रवी राणा तसेच स्वाभिमानी शिलेदारांचा आहे, असे खासदार नवनीत रवी राणा यांनी योवळी सांगितले.
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या खासदरकीला आता १८ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
खासदार नवनीत रवी राणा यांच्या आक्रमक पवित्र्याची सभागृहसोबत, विविध प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांनी दखल घेतली व अल्पावधीतच त्यांची ओळख एक सक्षम खासदार म्हणून संपूर्ण देशात निर्माण झाली.
महिला सक्षमीकरण,रोजगार निर्मिती व नावीन्यपूर्ण विकासाचा अजेंडा घेऊन त्या धडाक्याने कार्यरत आहे. मतदारांशी आत्मीयतेने सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी,मतदारांशी सहज सुलभ संपर्क या बाबीमुळे त्या लोकप्रिय आहेत. पती आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राबविलेले अनेक सामजिक लोकोपयोगी उपक्रम यामुळे त्यांचे नाव सर्वदूर गाजत आहे.या सर्व बाबींची दखल घेऊन एशिया पोस्ट व फेम इंडिया यांनी केलेल्या सर्वेमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशातील पहिल्या २५ श्रेष्ठ खासदारांच्या यादीत त्यांना समाविष्ट करण्यात येऊन हा बहुमान देण्यात आलेला आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, ३३ सामाजाची संघटना महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने महासचिव उमेश ढोणे, संजय हेडाऊ, डॉक्टर दीपक केदार, प्रा. बी. के. हेडाऊ, मीरा कोलटेके, वंदना जामणेकर, गोपाळभाऊ ढोणे, गजानन सूर्यवंशी,आदिंनी खासदार राणा यांचे अभिनंदन केले आहे विशेषत: राणा यांनी महामहिम राज्यपालांचे कडे या जमातींच्या संदर्भात बैठक घेतली होती. राष्ट्रपती यांच्याकडे सुध्दा मिटींग घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महिला दिनाच्यानिमित्ताने खासदार नवनीत रवी राणा यांचे अभिनंदन केले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये समावेश
Contents hide