यवतमाळ : स्थानिक वक्रतुंड सुगंध सेंटरमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून अमरावतीचे सह आयुक्त एस.जी. अन्नापुरे, यवतमाळ अन्नसुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी यांचेसह गोपाल माहुरे, गजानन मोरे, घनश्याम दंदे, दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव यांच्या पथकाने धाड टाकून एक लाख ७७ हजार ४७४ रुपयांचा महाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कृ.र. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साहित्यामध्ये सागर पान मसाला, विमल पान मसाला, पान पराग पान मसाला, डीजे सुगंधित तंबाखू व सुपारी आदींचे दोनशे तीन पाकीट जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संदीप सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये उज्वल ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीला अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलिस कोठडी मागण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक विलास सिडाम यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत दोन लाखांचा माल जप्त
Contents hide