• Mon. Sep 18th, 2023

अडसर ठरणार्‍या मुलाचा बापानेच काढला काटा

ByGaurav Prakashan

Mar 24, 2021

देवळी : शहरातील केदार लेआऊट मधील अरुण रामटेके वय ६५ याने त्याच्या अनैतिक संबंधात अडसर होत असल्यामुळे स्वत:च्या पोटचा मुलगा दीपक रामटेके वय ४0 याचा दोन तीनव्यक्तींच्या संगनमताने मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला.वीस वर्षांपूर्वी पुलंगाव येथून देवळी येथे आरोपी अरुण रामटेके स्थायी झाले.
आरोपी अरुण रामटेके किराणा दुकांदार होते.आरोपी अरुण रामटेके यांचीपहिली पत्नी कौशल्या यांच्याशी लग्न होऊन त्यांना एक मुलगा होता.काही कारणाने आरोपी अरुण रामटेके यांचं पटत नसल्याने पत्नी मुलाला घेऊन नागपूरला वेगळे राहू लागले.
या मध्ये आरोपी याने दुसरे लग्न केले.दुसरी पत्नी सुनंदा हिच्या देवळी येथील मालमत्ता जमवून देवळीतील केदार लेआऊट येथील घरात राहू लागला. तिथेच छोटे किराणा दुकान चालवत होता.परंतु काही आजाराने दुसर्‍या पत्नीचा मृत्यू झाला.यानंतर आरोपीच्या पहिल्या पत्नी आणि मुलगा मध्ये देवळीला येत राहत होता.
या दरम्यान आरोपी अरुण रामटेके याचे केदार लेआऊट मधील एका महिलेशी सूत जुळले आणि अनैतिक पद्धतीने ते घरी राहू लागले. यातच शनिवारी पहिली पत्नी, मुलगा व सून देवळी येथे आले होते.ते घरी येताच आरोपी अरुण रामटेके एका महिलेसोबत अनैतिक संबंधात घरी आढळले.
यावरून घरच्यांना राग अनावर होऊन पोलिसात तक्रार दाखल केली व अरुण रामटेकेची समजूत काढली व त्या महिलेस सोडून येण्यास सांगितले परंतु महिलेला सोडून देण्याच्या बहाण्याने घरा बाहेर पडत अरुण रामटेके घरी परतले नाही.
दुसर्‍या दिवशी रविवारी रामटेके पोलिसात तक्रार देण्यास गेले होते.अरुण रामटेके यांच्या दुसर्‍या पत्नीच्या वेळी त्याने एक मुलगी वैशाली हिला दत्तक घेण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे खून करते वेळी त्या मुलीचा नवरा त्याचे काही मित्र व मुलगी घटना स्थळी उपस्थित होती.आणि हे सर्व त्या दत्तक मुलीकडे खुनाचा डाव आखण्यात आल्याची माहिती आहे.
दुपारी दोन वाजताच्या दरम्यान मृतक दीपक रामटेके जेवण करीत असतांना त्यांच्या पत्नी व आई घरी स्वयंपाक करीत असतांना वडील अरुण रामटेके व इतर तिघे जण घरात घुसले व अरुण रामटेके नी त्यांच्या पत्नीला पकडून ठेवले व सोबत आलेल्या इतर तिघांनी मृतक दिपकवर चाकूने गळ्यावर छाती व पोटावर वार केला.
यात दीपक रक्तबंबाळ होऊन परिसरातील नागरिकांनी दवाखान्यात हलवले परंतु गंभीर जखमी असल्यामुळे दीपक वाटेतच मरण पावला. आणि सर्व आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला.
यातील मृतक मुलाचे वडील आरोपी अरुण रामटेके याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.यातील इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.या घटनेचा तपास देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे करीत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!