दारव्हा : तालुक्यातील सावंगी येथील पोलीस पाटील प्रकाश लक्ष्मण जाधव ह्यांना दि.२३ सप्टेंबर २0२0 रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी दारव्हा यांनी तक्रारीवरून निलंबित केले होते.परंतू हायकोर्टाच्या जि.आर.नुसार पुर्ववत कामावर रुजू होण्याचे आदेश महाराष्ट्र महसुल विभागाकडून दिले आहे.उपविभागीय अधिकारी दारव्हा यांनी दि.१९ मार्च २0२१ रोजी पोलीस पाटील पदावर रुजू होण्याचे आदेश दिले. सावंगी येथील पोलिस पाटील प्रकाश लक्ष्मण जाधव हे पोलीस पाटील पदावर पूर्ववत रुजू झाल्याने पोलिस पाटील संघटना लाडखेड, दारव्हा,नेर,यांनी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या आदेशाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.
Contents hide