• Mon. Sep 25th, 2023

24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

ByGaurav Prakashan

Feb 24, 2021

अमरावती : सुशिक्षीत उमेदवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी शोधून बेरोजगारांना उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याव्दारे ऑनलाईन पध्दतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदविणाऱ्या उमेदवारांनाच नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. ऑनलाईन मेळाव्याच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नामवंत उद्योजकांकडील एकूण 270 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित झालेली असून भरणे आहे.
दहावी, बारावी, पदवीधर, आय. टी. आय.(दोन वर्षाचा) फिटर व टिन वेल्डर ट्रेड उत्तीर्ण शैक्षणिक पात्रताधारक तसेच 18 ते 40 वयोमर्यादा असणाऱ्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेऊ इच्छीनाऱ्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या (सेवायोजन कार्यालयाच्या) www.rojgar.mahasayam.gov.in या पोर्टल आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करुन त्याआधारे शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने सहभाग (अप्लाय करावे) नोंदवावा. ज्या उमेदवाराची वेबपोर्टलवर नोंदणी नसेल. त्यांनी सर्वप्रथम पेार्टलवर नोकरी शोधक (जॉब सीकर) म्हणून नोंदणी करावी व तदनंतर प्राप्त होणाऱ्या युजरनेम व पासवर्डच्या सहाय्याने रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सदभाग नोंदवावा.
पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या नजीकच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करावी. जेणेकरुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन होईल. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना तसेच ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळी एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल. शक्य झाल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल.
सावन्स हेल्थ केअर प्रा. लि. (रेडीयन्ट हॉस्पीटल) सबनीस प्लॉट, विवेकानंद कॉलनी अमरावती या कंपनीत पुरुष वार्ड बॉय 10 रिक्त पदासाठी इयत्ता दहावी पास पात्रता आहे. श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. पिंपरी चिंचवड, ता. हवेली जि. पुणे येथे फेब्रीकेशन फिटर पदासाठी 20 (पुरुष/स्त्री), मशिनिस्टच्या 20 पदासाठी दहावी पास तसेच फिटरच्या 50 पदासाठी व टिंन वेल्डरच्या 20 पदासाठी दहावी पास व आयटीआय फिटर, टिनवेल्डर पास पात्रता आहे. व्हि.एच.एम. इंन्डस्ट्रिज लि. नांदगाव पेठ जि. अमरावती या कंपनीत ट्रेनी (पुरुष) 50 पदासाठी इयत्ता दहावी पास पात्रता आहे. पियागो व्हेईकल प्रा. लि. बारामती जि. पुणे येथे ट्रेनी (पुरुष/स्त्री) 100 पदासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी पात्रता आहे.
अशी करा पोर्टलवर नोंदणी :
रोजगार मेळाव्यात इच्छुक युवक युवतींनी दि. 24 ते 28 फेब्रुवारी पर्यंत www.rojgar.mahasayam.gov.in या वेबपोर्टल नोकरी शोधक/नोकरी शोधा (जॉब सीकर) या ऑप्शनवर क्लिक करुन जॉब सीकर हा पर्याय निवडावा. तयार केलेल्या युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने साईन इन करुन होमपेजवर पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडावा, त्यानंतर आपल्या जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याची यादी दिसून आल्यावर 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंतच्या मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर आय ॲग्री हा पर्याय निवडून ॲप्लाय बटणवर क्लिक करावे.
विभागाच्या वेबपोर्टलवर अप्लाय करताना किंवा इतर काही अडचण उद्भल्यास कार्यालयाच्या 0721-2566066 यावर किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेल संपर्क साधावा. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यातील अधिकाधिक युवक युवतींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!