नवी दिल्ली : आक्रमक रणनिती आखून लसीकरण करण्यात फायदा असल्याचे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या गटात कोणाचा समावेश करणार, ते सरकारने अजून स्पष्ट केलेले नाही. ज्यांना सर्वाधिक धोका आहे, अशा नागरिकांना प्राधान्य दिले जाईल, असे गुलेरिया म्हणाले. करोनामुळे मृत्यूचा धोका असलेल्यांचे विशेष गट बनवण्यात आले आहेत. ज्यांना ह्दयविकार, मधुमेह आणि कर्करोग आहे, त्याशिवाय अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि स्टेरॉईडवर असलेल्या रुग्णांचा या गटात समावेश होतो, असे गुलेरिया एका दैनिकाशी बोलताना सांगितले.
दुसर्या टप्प्यात लसीकरणासाठी आक्रमक रणनिती आखून काम करावे लागेल. त्यामुळे कोरोना फैलावण्याचा संसर्ग, मृत्यूदर कमी होईल तसेच मूळ व्हायरसमध्ये होणारे म्युटेशन म्हणजेच परिवर्तन देखील कमी होईल. सध्या देशात कोरोना रुग्णांची, जी संख्या वाढलीय, त्यामागे व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन म्हणजे परिवर्तन मुख्य कारण असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय.
कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने येत्या एक मार्चपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. हा टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या फेजमध्ये ज्येष्ठांसह (६0 वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार आहे.
४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांचेही होणार कोरोना लसीकरण – गुलेरिया
Contents hide