• Sun. May 28th, 2023

२३३ कोरोना रुग्ण; एकाच दिवसातील सर्वाधिक उच्चांक

ByGaurav Prakashan

Feb 6, 2021

अमरावती : गेल्या आठ दिवसापासुन जिल्ह्य़ात कोरोनाबाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत असून ५ फेब्रुवारी रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी सर्वाधिक उच्चांक गाठला असून २३३ रुग्ण हे एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे जिल्हयात एकुण २२ हजार ६६७ रुग्णांची कोरोनाग्रस्त म्हणून नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसिकरणाचा कार्यक्रम हा नित्यनियमितपणे सुरू असतानादेखील कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असून जिल्ह्य़ात मृतकांचा आकडा हा ४२३ वर पोहोचला आहे. ४00 च्या जवळपास रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू असून २१ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशासह राज्यात कोरोग्रस्तांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच रुग्णांचा आकडा हा शून्यावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी हा आकडा अदयापही आटोक्यात येत नसल्यामुळे प्रशासनासमोर नव्याने संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर लस निर्माण झाल्यानंतर कोरोनाचा कहर नष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, लसीकरणाच्या मोहीमेनंतरदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व कोरोनामुळे मृत होणार्‍याच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्हयात कोरोना रुग्णामध्ये होत असलेली वाढ पाहता जिल्हा प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे तसेच सावधागिरी बाळगण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
वास्तविक परिस्थीती पाहता सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे या सारख्या नियमांचा नागरिकांना जणू विसर पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. बाजारपेठ, शासकीय कार्यालय,खासगी कार्यालय, समारंभ, वा इतर ठिकाणी वावरत असतांना नागरिक हे बिनधास्तपणे वावरत असून कोरोना हा विषयच संपल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये निर्माण झालेली बिनधास्त वागण्याची प्रवृत्ती आणि नियमांचे पालन न करण्याची सवय यामुळे जिल्हयात नव्याने कोरोना संक्रमणानीच लाट तयार झाली असुन याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका हा नियम पाळणार्‍यांना देखिल बसत आहे. ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हयात २३३ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आले असून २२ हजार ६६७ रुग्ण हे आतापर्यत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ४२३ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून ४00 च्या जवळपास रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *