• Sat. Jun 3rd, 2023

१७९ नवीन पॉझिटिव्ह, दोघांच्या मृत्यूसह आकडा ४२२ वर

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021

अमरावती : कोरोना विषाणुचे सावट सर्वत्र पसरले असून देशासह राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत सध्यास्थितीत घट पहावयास मिळत आहे . मात्र अमरावती जिल्हयात गेल्या काही दिवसापासुन सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या राज्यात उल्लेखनिय ठरत आहे. ३ फेब्रुवारी २0२१ रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १७९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली असून हि वाढ गेल्या काही महिन्यांतील उच्चांकापर्यत जावुन पोहोचली असल्यामुळे जिल्हयात आतापर्यत २२ हजार २७६ रूग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्या देखिल झपाटयाने वाढत असुन ३ फेब्रुवारी २ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्हयात ४२२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.२१ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले असले तरी ४00 च्या जवळपास रूग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहे.
जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या रूग्णसंख्येवर वारंवर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर प्रशासनाने आखुन दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटोकर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र तरीही बाजारपेठा, लग्न समारंभ, राजकीय सभा, बैठका यासह इतर ठिकाणी नागरिकांकडून प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंधन हे कोरोना रूग्णांच्या वाढत्या उच्चाकाला पाठबळ देणारे ठरले. देशासह राज्यात पूर्वी प्रमाणे परीस्थिती निर्माण होवू नये यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी कोरोनाच्या केंद्रस्थानी असलेला मनुष्य हा मात्र या भयावह वास्तव्यापासुन अद्यापही अनभिग्नच असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.विशेष म्हणजे कोरोना रूग्णांसोबतच जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूमध्ये देखिल झपाटयान वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्हयात ३ फेब्रुंवारी पुन्हा दोन रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ज्यामध्ये छत्रसाल नगर येथील ६७ वषीर्य पुरूष तर अंबिका नगर येथील ६४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यत ४२२ रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३ फेब्रुवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १७९ रूग्ण हे नविन कोरोनाग्रस्त म्हणुन आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत २२ हजार २७६ रूग्णांना कोरोनाची लागन झाली आहे. २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन ४00 च्या जवळपास रूग्णांवर उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *