यवतमाळ : १५ फेब्रुवारी सतगरू सेवालाल महाराज जयंती असून हा दिवस गोर समाजबांधवांनी एक उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन यवतमाळ जिल्यातील सेवानगर (कासार बेहळ) तांडयाचे नायक उत्तम राठोड यांनी केले. गत वर्षी कोरोणा लॉकडानऊच्या पास्र्वभूमीवर सन उत्सव करण्यावर मोठय़ा प्रमाणात र्मयादा आल्या होत्या. त्यामुळे समाज बांधवाचा हिरमोड झाला होता. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्द झालेली असली तरी अध्याप कोरोणाचे संकट दूर झालेले नसल्याने कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक असून नागरिकांनी घराघरावर पंधरा ध्वज लावावा. शक्य होईल त्यांनी नवीन वस्त्रे परीधान करावी, विशेष बाब म्हणून या दिवशी विविध व्यसणाचा त्याग करण्याचा संकल्प करावा. सतगरु सेवालाल महाराजाचे चारीत्र वाचन करून त्याचा आदर्श घ्यावा. यासाठी सेवानगर कासारबेहळ तांड्यातील नायक, कारभारी, हसाबी, नसाबी, डायसाळे व तांड्यातील तरून मंडळीनी पुढाकार घेऊन मोठया उत्साहाने हा उपक्रम साजरा करण्यासाठी सर्व नागरीकांना एकत्र आणून उत्सव साजरा करावा असे आवाहन उत्तम राठोड (नायक) यांनी केले आहे.