मुंबई: २0२0 हे वर्ष सर्वांसाठीच कठिण होते. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या. काहींचे बिझनेस ठप्प झाले. याची झळ तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल चंपकलाल गडाला देखील बसली आहे. मालिकेत जेठालाल गेल्या १२ वर्षांपासून एक दुकान चालवत आहे.लॉकडाउनमुळे त्याचे गडा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान अक्षरश: बंद पडायला आहे. त्याचे नुकसान झाले आहे.
लॉकडाउनमध्ये एका व्यापाराला जेठालालने क्रेडिटवर एक मोठी ऑर्डर दिली होती. सर्व सुरळीत सुरु झाल्यावर जेठालालने त्या व्यापार्याकडून पेमेंट घेण्यासाठी फोन केला होता. पण त्या व्यापार्याने जेठालाल पेमेंट देण्यास नकार दिला.
इकतच नव्हे तर त्या व्यापार्याने स्वत:चे नुकसान झाल्याचे जेठालालला सांगितले. लॉकडाउन होण्यापूर्वी जेठालालने दुकानात सामान भरले होते. त्याचे पैसे जेठालालला द्यावे तर लागणारच आहेत.
दुसरीकडे लॉकडाउन दरम्यान जे क्रेडिटवर सामान दिले त्याचे पैसे मिळणे कठिण झाले आहे.
जेठालालच्या अडचणी वाढत आहेत. गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे नुकसान झाले आहे.मालिकेच्या आगामी भागाच्या प्रोमोमध्ये जेठालाल बापूजींना त्याचे दुकान विकतो आणि त्यातून मिळणार्या पैशातून कर्ज फेडतो. ते कर्ज फेडून तो गावी जाणार असल्याच्या चर्चा दाखवण्यात आल्या आहेत. जेठालाल गावी जाणार हे ऐकून गोकुळधाममधील सर्वांना धक्का बसतो. आता गडा इलेक्ट्रॉनिक्सला टाळा लागणार का? जेठालाल गावी जाणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
१२ वर्षांनंतर तारक मेहतामधील जेठालाल सोडणार गोकुळधाम सोसायटी?
Contents hide