थंडीत बरेच आजार डोकं वर काढतात. त्यापैक एक म्हणजे टायफॉईड. टायफॉईड झाल्यानंतर बर्याच कालावधीपर्यंत ताप राहतो. ताप तसंच सतत अस्वस्थता, चिंता, काळजी जाणवणं हे टायफॉईडचं लक्षण असतं. साल्मोनेला एंटेरिका सेरोटाईप टायफ नामक जीवाणू टायफॉईडला कारणीभूत ठरतो.
दूषित पाणी तसंच अन्नाच्या माध्यमातून हा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. उन्हाळ्यापेक्षाही हिवाळ्यात टायफॉईडचा धोका अनेक पटींनी वाढतो. या जीवाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर साधारण एक ते दोन आठवड्यांनी टायफॉईडची लक्षणं दिसू लागतात. टायफॉईडचे जीवाणू दूषित पाणी तसंच अन्नघटकांमध्ये बराच काळपर्यंत जिवंत राहू शकतात. या आजारावर उपचार आहेत. मात्र ही व्याधी पूर्णपणे बरी होण्यासाठी एक ते दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. काही प्रकरणांमध्ये टायफॉईड बरा होण्यासाठी तीन ते चार आठवडेही लागू शकतात. टायफॉईडमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्याने इतर आजारांचा धोका वाढतो.
बराच काळ येणारा तीव्र स्वरुपाचा ताप, तापासोबत खूप थंडी वाजणं ही टायफॉईडची सर्वसाधारण लक्षणं आहेत. टायफॉईडमध्ये १0४ अंशांपर्यंत ताप चढू शकतो. तापासोबतच डोकेदुखी असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. स्नायू आखडणं, सांधेदुखी, अंगदुखी, भूक मंदावणं, वजन कमी होणं, भीती वाटणं ही टायफॉईडची लक्षणं आहेत. टायफॉईड झाल्यानंतर रुग्णाला प्रतिजैविकं दिली जातात. या प्रतिजैविकांमुळे रुग्ण बराही होतो. मात्र टायफॉईडसोबत इतर आजार असतील तर त्यानुसार उपचार केले जातात. टायफॉईड पुन्हा डोकं वर काढू शकतो.
हिवाळ्यात वाढतो टायफॉईडचा धोका
Contents hide