• Thu. Sep 28th, 2023

हर्षाने पोलिसांसमोर दिलेले बयाण न्यायालयात फिरवले

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

चांदूरबाजार
तालुक्यातील कुरल पूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी रवी व फारकत झालेली पत्नी हर्षा हिने, सासरी राहण्याचे पोलिसांसमोर दिलेले बयाण आज न्यायालयात फिरवले. आरोपी रवीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांना बयाण देतेवेळी आरोपी समोर असल्याने घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना सासरी जाण्याचे बयाण दिले होते, अशी कबुली हर्षा ने न्यायालयात दिली. यामुळे आरोपीवर अपहरणाचा गुन्हा कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माझे वडील व भाऊ तसेच आजोबा वर चाकूने वार केल्याचे सांगून त्यांनीच मला जबरीने पळवून नेल्याचे बयाण, फारकत झालेली पत्नी हर्षाने न्यायालयासमोर दिले आहे. तसेच सासरी जाणार नसल्याचे सांगितल्यावरून चांदूर बाजार पोलिसांनी तिला,तिची आई मीर साबळेच्या स्वाधीन केल्याची माहिती चांदूर बाजार पोलिसांनी दिली. तालुक्यातील कुरळ पूर्णा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी पकडून न्यायालयात सादर केल्या नंतर २0 फेब्रुवारीपयर्ंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत रवीने हत्याकांडात वापरलेले चाकू कुरळ पूर्णा फाट्यावर लपवून ठेवलेला होता. तो चाकू पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांनी घेतलेल्या बयानात रवीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पत्नीला आणण्यासाठी कुरळ पूर्णा गेलो असता सासरे व मेहुण्याने अडवून मला मारहाण केल्याने रागाच्या भरात त्यांना चाकूने मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपी रवी, पत्नी हषार्ला दुचाकी क्रमांक एम एच २७ बियु १८६६ स्प्लेंडर आय स्मार्ट गाडी वर सोबत घेऊन अमरावतीला गेला. तिथे त्याने आपली दुचाकी मित्राला देऊन अशियाड बस ने अमरावती वरून शिवाजीनगर पुणे येथे पोहोचला. तिथे चुलत भावाकडे पाणी प्यायला व तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. १७ फेब्रुवारी पहाटे तीन वाजता आरोपी रवी व हषार्ला चांदूर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी रवीने हर्षाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने बयाण घेतेवेळी हर्षा ही रवीसमोरच असल्याने माहेरी जाण्यास नकार देऊन सासरी जाणार असल्याचे बयान पोलिसांना दिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आपण रवीच्या भीतीमुळे तसे बयाण दिल्याचे पोलिसांना सांगून रवी सोबत जाणार नसल्याचे सांगितले. हेच बयाण तिने न्यायालयात सुद्धा दिले आहे. यामुळे आरोपी रवि वर जीवे मारणे, जीवे मारण्याचा प्रयत्नासह अपहरणाचा गुन्हा ही कायम राहणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

छाया : संग्रहित