- चंद्र नभात झुरतो
- मज राहवले नाही,
- सौख्य त्याचे चांदण्याशी
- मज पाहवले नाही.
- घन रात्रीच्या अंधारी
- पानें झाडांची रुसली,
- कुठे झूळूक वाऱ्याची?
- उदासपणे हसली.
- अनुबंध पाकळ्यांचा
- तम धुक्यात विरला,
- पुढे लिंबोणी सावल्या
- मागे एकांत उरला.
- रात्र झुले काजव्यांनी
- रातकिडे गाणे गाती,
- दूर हाक दुभंगते
- चंद्र अर्धा उरे हाती.
- अश्या व्याकुळ समयी
- तुझ्या स्पर्शाचे स्मरण,
- आणि दिठीत सोबत
- फक्त अभागी स्पंदन!
- सतिश कोंडू खरात
- वाशिम
- ९४०४३७५८६९
- (चित्र : फेसबुक वरून साभार)
Contents hide