- काय झालं बाबा
- काही कळलंच नाही
- कोरोना ने बंद शाळा
- अजून उघडल्याच नाही
- स्क्रीन समोर बसून
- आता कंटाळा आला
- सुट्ट्यांचा नवल सारा
- आता संपुष्टात आला
- छोट्याशा खिडकीतून
- बाईंचा येतो फक्त आवाज
- स्क्रीनवरच्या शाळेत होतो
- सगळाच नाईलाज
- नको वाटते आता
- हि खिडकीतली शाळा
- आठवतो पुन्हा पुन्हा
- वर्गातला मोठा फळा
- बस झालं देवा आता
- कोरोणाची कर सुट्टी
- कळलं आम्हा सारं आता
- कधीच नाही मारणार बुट्टी
Contents hide
- सौ.शितल राऊत
- अमरावती
(Image Credit : The wire)