मुंबई : सैफ अली खान जितका चांगला अभिनेता आहे तितकाच तो फॅमिली मॅनही आहे. तो चौथ्यांदा बाबा होणार आहे. त्याला पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं आहेत. तर करिना कपूर खानपासून त्याला तैमूर अली खान हा मुलगा आहे. लवकरच सैफ आता चौथ्यांदा बाबा होणार आहे. सैफ आणि करिना आपल्या दुसर्या बाळाचं स्वागत करण्यास तयार आहेत. आता सैफने पितृत्व रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नवजात बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सैफने पॅटर्निटी लीव्हचं महत्त्व किती मोठं आहे याबद्दलही चर्चा केली. सैफ म्हणाला की ही एकमेव अशी सुविधा आहे ज्यात प्रत्येक वडिलांना त्यांच्या कामातून वेळ काढून तो कुटुंबाला देण्याची मुभा आहे.
अभिनेता म्हणाला, ह्यजेव्हा तुमच्या घरी बाळ जन्माला येतं तेव्हा कोणाला काम करण्याची इच्छा असते. जर आपल्याला मुलांना मोठं होताना पाहता येत नसेल तर ते चुकीचं आहे. मी कामामधून वेळ काढू शकतो आणि ही सोयीची परिस्थिती आहे. ९ ते ५ प्रमामे नित्यक्रम करण्याऐवजी मी अभिनेता म्हणून जगतो. आपला धर्म आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्या करिअरवर आधारित असतो. सैफ पुढे म्हणाला की तो ज्या व्यवसायात आहे तो थोडासा गोंधळात टाकणारा आहे. म्हणूनच स्वत: ची काळजी घेणं आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेणं आवश्यक आहे. तो म्हणाला, ह्यमाज्यासाठी स्वत: ची काळजी घेणं म्हणजे चित्रपटांसाठी चांगलं दिसणं आहे. यात सर्व काही आलं, जसं निरोगी खाणं, व्यवस्थित झोप, आनंदी असणं आणि मन:शांती असणं. सैफ अली खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच ह्यतांडव या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यानंतर तो ह्यआदिपुरुष चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. यासोबतच अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिससोबत तो ह्यभूत पोलिस मध्येही दिसणार आहे.
सैफ जाणार पितृत्व रजेवर
Contents hide