• Mon. May 29th, 2023

सूर्य शक्तिमान….…

ByGaurav Prakashan

Feb 9, 2021
    सूर्याची किरणे । मोफत सर्वांना ।
    हवी आहे ज्यांना । मिळणार ।।
    प्रभात समयी । त्वरीत उठणे ।
    सूर्यास करणे । नमस्कार ।।
    मग बघा सूर्य । शक्ती किती देतो ।
    रोगराई नेतो । फार दूर ।।
    त्यांच्या कृपेमुळे । सृष्टीत जीवन ।
    करतो जतन । जीवसृष्टी ।।
    सूर्य शक्तिमान । सूर्य प्राणदाता ।
    सूर्य आहे त्राता । जाण ठेवा ।।
    सूर्यात क्षमता । सृष्टी जाळण्याची ।
    गर्व हरण्याची । क्षण मात्रे ।।
    म्हणून सूर्याला । राग नका आणू ।
    त्यास नका जाणू । ताऱ्यासम ।।
    अजु म्हणे सूर्य । खराखुरा देव ।
    तोच एकमेव । प्रकाशित ।।

©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,

    तरनोळी
    ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *