• Thu. Sep 28th, 2023

सीईओ बनायचे तर..

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021

कारकिर्दीत मोठा टप्पा गाठणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. त्यासाठी कॉलेजमध्ये असल्यापासून स्वप्नरंजन सुरू होतं. मात्र हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नरत राहणं गरजेचं आहे. भविष्यात सीईओ बनवण्याची स्वप्नं बघणार्‍या विद्यार्थ्यांनी तर आत्तापासून प्रयत्नांची दिशा निश्‍चित करायला हवी.
कॉलेजमध्ये असतानाच स्वत:तील नेतृत्त्वगुण विकसित करू शकता. इतकंच नाही तर कॉलेजमध्ये व्यवस्थापन यंत्रणेत काम करण्याची संधीही मिळते. त्यामुळे ग्रुप प्रोजेक्ट्स, प्रेझेंटेशन करताना आपण उद्योजक असल्याचा विचार करा. व्यवसायातली एखादी परिस्थिती समोर ठेऊ न प्रोजेक्ट्स करा. सामाजिक कार्य करा. या कामांमुळे खूप चांगला अनुभव मिळतो. कॉलेज कॅम्पसमध्ये काम करणं शक्य नसेल तर कोणत्याही संस्थेसोबत काम करा. यामुळे समस्या सोडवण्याची कौशल्यं विकसित होतील. खेळाशी संबंधित क्लबशी जोडले जा. यामुळे संवाद कौशल्य आणि टीम स्परिट विकसित होईल. कॉलेजमधल्या निवडणुकांमध्ये सहभागी व्हा. लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची कला विकसित होईल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!