• Thu. Sep 21st, 2023

सामाजिक शांततेला नख लावणार्‍यांची गय नाही – पोलिस अधीक्षक

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021

महागाव : आगामी उत्सव व सण काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जवाबदारी पोलिसांसोबत नागरिकांची सुद्धा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सामाजिक शांततेला नख लावणार्‍या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा गर्भित इशारा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिला.
तहसील कार्यालयात आगामी उत्सव, कोरोनाची पार्श्‍वभूमी, आणि सणे लक्षात घेता शांतता समितीची बैठक पार पडली,त्यावेळी ते बोलत होते. उपविभगिय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, नायब तहसिलदार डॉ. संतोष अडमुलवाड , ठाणेदार विलास चव्हाण, शांतता समितीचे प्रतिनिधी संभाजीदादा नरवाडे,महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, जनअंदोलन संघर्ष आधार समितीचे संस्थापक जगदीश नरवाडे,कॉंग्रेस जिल्हाउपाध्यक्ष महिंद्र कावळे, फुलसावंगी चे प्रतिष्ठित नागरिक जानी नवाब, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,कॉंग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया, मा. उपाध्यक्ष नगरपंचायत शैलेश कोपरकर,रामराव पाटील नरवाडे,महागाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय भगत,प्रहार उपजिल्हा प्रमुख अमोल आवटे,रियाज पारेख उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ म्हणाले की, कोरोना संकट गडद आहे.त्याच पार्श्‍वभूमीवर आगामी सणा करिता शासनाने नियमावली जारी केली आहे.अवघ्या काही दिवसात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याने र्मयादित व्यक्तींनी आपला सण साजरा करावा. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला काही टिप्स दिल्या.तर उत्सवादम्यान सामाजिक अंतर आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना वजा विनंती यावेळी नागरिकांनी विनंती केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!