• Sun. May 28th, 2023

सततच्या थकव्यामागील कारणे

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021

सतत थकवा येत असेल तर या तक्रारीची दखल घ्यायला हवी. या थकव्यामागे किरकोळ कारणं असू शकतात अथवा कॅन्सर, हृदयविकारासारखे गंभीर आजारही यास कारणीभूत ठरू शकतात.
सतत थकवा येत असल्यास त्याला क्रोनिक फटीग सिंड्रोम असं म्हणतात. फक्त आराम करून थकवा दूर होत नाही. पेशींना कमी प्रमाणात होणारा ऑक्सिजनचा पुरवठा हे शारीरिक थकव्यामागील एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे हृदयाचं कार्य मंदावल्यास किंवा रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता घटल्यास थकवा येऊ शकतो. फुफ्फुसाच्या विकारांमुळेही शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. थायरॉइड हे अनेक विकारांचं मूळ असू शकतं. थायरॉइडची पातळी कमी किंवा जास्त झाल्यास, विशेष करून महिलांना दिवसअखेर थकवा येऊ शकतो. लाल रक्तपेशी ऑक्सिजनचं वहन करतात पण अँनिमिया असलेल्या व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी झाल्याने थकवा येतो. हृदयाचं कार्य मंदावल्यास शरीराला योग्य पद्धतीनं ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. यामुळे थकवा जाणवतो. हृदयाचं कार्य मंदावल्यास धाप लागते आणि सतत थकवाही जाणवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *