• Mon. Jun 5th, 2023

संगीत शिक्षिकेने नाकारली शकिरा झाली टॉपची सिंगर

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021

नवी दिल्ली : टॉपची गायिका शकिराचा नुकताच वाढदिवस झाला. १९७७ रोजी कोलंबियामध्ये जन्मलेली शकिरा आई-वडिलांची एकुलची एक मुलगी आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिने कविता लिहिली होती. बालपणी वडिलांना टाईपरायटरवर काम करताना पाहून आवडायचं. तिला टाईपरायटर इतकं चांगलं वाटायचं की, तिने वडिलांकडे एकदा ख्रिसमसला गिफ्टमध्ये टाईपरायटर मागितलं होतं. तिला टाईपरायटरच्या माध्यमातून आपल्या कविता लिहायच्या होत्या. एक दिवस वडिलांनी तिला टाईपरायटर गिफ्ट केलं. त्यावेळी तिचे वय सात होतं. तिला हे गिफ्ट मिळताच तिने कविता लिहायला सुरूवात केली. यानंतर ती दीर्घकाळ कविता लिहित राहिली. पुढे या कविता तिच्या गाण्यात रुपांतरीत झाल्या.
इयत्ता पहिलीत असताना तिने शाळेत गाणे गायला सुरुवात केली. बेली डान्सिंगमध्येही तिला आवड होती. एकदा सामुहिक गाण्यासाठी तिची निवड करण्यात आली नव्हती. शिक्षिकेने हे सांगत नकार दिला की, तिचा आवाज खूप घोगरा आहे. संगीत शिक्षकानेही तिचा आवाज बकरीसारखा असल्याचे सांगून चेष्टा केली होती. इतका सगळा प्रकार घडूनही ती निराश झाली नाही आणि गायन क्षेत्रात तिने आपला अभ्यास करत राहिली. शाळेत तिला बेली डान्सर गर्ल म्हणून ओळखले जायचे.
वडिलांकडून जीवनाची शिकवण
एकदा शकिराने लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळाली. यानंतर तिला आपल्या पॅशनविषयी माहिती झालं की, अखेर ती काय करु शकते. दरम्यान, वडील दिवाळखोर झाले आणि घरातील बहुतेक वस्तू विकल्या गेल्या. म्हणून आई-वडिलांनी तिला काही दिवस नातेवाईकांच्या येथे पाठवलं. जेव्हा ती परत आली, तेव्हा आयुष्याचं वास्तव समजण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला एका लोकल पार्कमध्ये घऊन गेले. येथे अनाथ मुले राहायची. ते ठिकाण खूपचं अस्वच्छ होते. शकिरा ते पाहून खूप दु:खी झाली. तेव्हा तिने ठरवलं की, एक दिवस मोठी कलाकार बनून या मुलांची मदत स्वत: करेन. वयाच्या दहाव्या वषार्पासून तिला अनेक इव्हेंट्समध्ये गाण्यासाठी बोलावलं जायचं.
वयाच्या १३ व्या वर्षी पहिले रेकॉडिर्ंग
त्यांचे टॅलेंट पाहता १९९0 मध्ये सोनी म्युझिक कोलंबियाने तिला रेकॉडिर्ंगची ऑफर दिली. तेव्हा ती १३ वर्षाची होती. हे गाणे तिने वयाच्या आठव्या वर्षी लिहिलेल्या कवितावर आधारित होते. १९९१ मध्ये तिचा अल्बम रिलीज झाला. यानंतर तिचे दोन अल्बम आले. परंतु, यास म्हणावे तसे यश मिळाले नाही. पुढे तिने स्वत:च्या ब्रँडसाठी संगीताची निर्मिती करण्याचे ठरवले. पीएस देस्काल्सोस अल्बम (१९९४) मुळे लॅटिन अमेरिका आणि स्पेनमध्ये तिला खूप प्रसिद्धी मिळाली. १९९६ मध्ये रिलीज झालेल्या तिचा अल्बम जगभरात ६0 लाखहून अधिक लोकांनी पाहिला होता. तिचे अनेक अल्बम हिट झाले. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार, सात लॅटिन ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी ही गायिका शकीरा इजाबेल मेबारक रिपोल जगभरात शकीरा नावाने ओळखली जाते.
गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी तिला नामांकन होते. लॅटिन गायिका शकिराचे प्रसिध्द गाणे वाका वाका २0१0 मधील विश्‍वकप फुटबॉल स्पर्धेचे अधिकृत गाणे म्हणून निवडण्यात आले होते. एक यशस्वी गायिका असण्याबरोबरचं शकीरा समाजसेवकदेखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *