• Wed. Jun 7th, 2023

श्रमात जगतो.….

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021
    मनी एक आशा । तेवत ठेवतो ।
    श्रमात जगतो । निरंतर ।।
    लेखणीला माझ्या । झुकू देत नाही ।
    कधी घेत नाही । मद्य प्याला ।।
    सुख जीवनात । नसेल मिळाले ।
    विकार जळाले । मात्र माझे ।।
    गुरुच्या चरणी । करतो वंदन ।
    ठेवतो वदन । प्रफुल्लीत ।।
    स्वतःच्या दुःखाला । कशाला दावणे? ।
    मरत जगणे । निरर्थक ।।
    दुःख लपवून । सुख वाटणारा ।
    नित्य हसणारा । खरा नर ।।
    स्वतःच्या हिताला । भुलून जगणे ।
    दीनास करणे । सहकार्य ।।
    हेची माझे कर्म । सत्य माझा धर्म ।
    जीवनाचा मर्म । हाच खरा ।।
    अजु बोलणार । तसा वागणार ।
    नित्य असणार । प्रामाणिक ।।

शब्दसखा-

    अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *