• Mon. May 29th, 2023

शेतकर्‍याच्या मुलाने शेतकर्‍याच्या जीवनावर काढला लघुचित्रपट

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021

अंनजनगाव सुर्जी : अंबावती फिल्म प्रोडक्शन निर्मित शेतकर्‍याच्या जिवनावर आधारित राख या लघुचित्रपटाची एक झलक अंजनगाव सुर्जी येथे अगदी थाटामाटात प्रक्षेपित करण्यात आली.प्रक्षेपिकरणाच्या वेळी उपस्थित सर्व मंडळीनी उस्फूर्त असा प्रतिसाद देऊन संपूर्ण अंबावती फिल्म प्रोडक्शन समुहाचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.प्रक्षेपिकरणाच्या कार्यक्रमात प्रास्ताविकामध्ये दिग्दर्शक सुरज मुरकुटे यांनी चित्रीकरणाच्या वेळी आलेल्या अडचणी विशद केल्या असून, शेतकर्‍यांच्या अतीशय हलाखीच्या आयुष्याला बघून राख या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कल्पना सुचल्याचे सुरज याने सांगितले, तसेच राख हा लघुचित्रपट आता प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल हे सुद्धा सुरज मुरकुटे त्यांनी प्रास्ताविकेत स्पष्ट केले. तसेच करण घटाळे यांनी या लघुचित्रपटाचे लेखन केले असून त्यांनी शेतकर्‍याचे वास्तव आपल्या दोन शब्दात व्यक्त केले तसेच ख्यातनाम युवा कवी व गीतकार अमित भांडे यांनी सुद्धा आपल्या खास शैलीतून शेतकर्‍याच्या जीवनावर लिहिलेली वर्‍हाडी कवीता भाकर बेसन सादर करून आपल्या उत्कृष्ट शैलीने सर्व उपस्थितांचे मने जिकंली व तसेच अंबावती फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत हा पहिलाच प्रोजेक्ट असून या नंतरही अविरत आपल्या विदर्भातील वर्‍हाडी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी व तसेच विदर्भातील कलावंतांना प्रकाशझोतात आणण्यासाठी अंबावती फिल्म प्रोडक्शन नेहमी तत्पर राहिल असे सांगितले. राख या लघुचित्रपटाला पुर्णत्वास नेण्यास लाभलेल्या टिम मध्ये दिग्दर्शक सुरज मुरकुटे, ऊत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर तथा संपादक सोपान सगणे तसेच मुख्य भुमिकेत असलेले रंगा पतंगा फेम विवेकजी पातोंड संगीत संयोजक पवन वडूरकर,कवी व गीतकार अमित भांडे सहाय्यक फोटोग्राफर आकाश इंगोले, मेकअप मॅन नितू हाडोळे, रूपाली डोंगरे तसेच सहाय्यक कलाकार अनिल वरखडे,आस्था होडोळे,सुविधा वरखडे,कृष्णा पानबुडे,संजय कोलटकर,सोशल मिडीया प्रमुख सौरभ टिपरे, तसेच पॉवर ऑफ मिडीया अंजनगाव सुर्जी आदींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.सदर कार्यक्रमाच्या वेळी उद्घाटक म्हणून लाभलेले गणोरकर ज्युनिअर कॉलेज चे सस्थापक, डॉ.श्रीकृष्ण गोरडे यांनी सुद्धा राख लघुचित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रदीप पाटील चित्रकार, गजानन घटाळे, मनोहर मुरकुटे ,नामदेव घोडे,राजेंद्र भांडे, सौ संगीता गोरडे, राजेश टाले, सुधीर बचे, तसेच पत्रकार सुदेश मोरे, सुरेश दादा साबळे ,गिरीश लोकरे,सागर साबळे,मयूर रॉय, साजिद सौदागर,प्रज्वल येऊल व ईतर गावकरी मंडळी ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.नितू हाडोळे यांनी केले असून आभार प्रदर्शन अमित भांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *