• Thu. Sep 28th, 2023

शिवबा

ByGaurav Prakashan

Feb 19, 2021
  मावळ्याच्या पोरामधूनी
  महान पराक्रमी शिवबा घडला.
  गर्जना करून स्वराज्याची
  मुगल बादशाह हादरून गेला……
  पहाडाच्या छातीवर बसूनी
  गडकिल्ले सर केला.
  नव्या गनिमीकाव्याने
  लढाईचं तंत्र बदलला…..
  कुळवाडीभुषण होऊनी
  फितुर भटपंड्याचा कोंदा काढला.
  वार करणाऱ्या कृष्णाजीला
  तलवारीने क्षणात गारद केला.
  जीजाईच्या स्वप्नामधला
  नवं महाराष्ट्र निर्माण केला.
  सकल रयतेच्या कल्याणासाठी
  नवं संहिता तयार केला…
  गर्जतो रव सह्याद्रीत
  शिवबाच्या लढवय्य क्रांतीचा.
  अठरापगड जात बांधवाना
  प्रकाश दिला लढवय्य तेजाचा…
  -संदीप गायकवाड
  नागपूर
  ९६३७३५७४००

Thank you for reading this post, don't forget to subscribe!