• Sun. May 28th, 2023

शाळा भरली पक्ष्यांची

ByGaurav Prakashan

Feb 24, 2021
  हिरव्या- हिरव्या झाडांवरती
  सुंदर सुंदर पक्ष्यांची
  शाळा भरली सार्‍यांची
  चिव-चिवनाऱ्या चिमण्यांची
  थूई-थूई नाचणाऱ्या मोरांची
  मिठू-मिठू बोलनाऱ्या पोपटांची
  उंच-उंच उडणाऱ्या गरुडाची
  काव-काव करणाऱ्या कावळ्यांची
  ठक- ठक करणाऱ्या सुतार पक्षाची
  क्व्याक-क्व्याक करणाऱ्या बदकाची
  पांढर्‍याशुभ्र बगळ्यांची
  चाणाक्ष नजरेच्या ससाण्याची
  कुहू -कुहू गाणाऱ्या कोकिळेची
  गूटरगु करणाऱ्या कबुतरांची
  पहाटे आरवनाऱ्या कोंबड्याची
  शाळा भरली पक्ष्यांची
  गट्टी जमली साऱ्यांची
  सोबतीला होता गोड गोड खाऊ
  गंमत जंमत गाणी गाऊ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *