पुणे : आळंदीत सध्या सोन्याच्या वस्तर्याची जोरदार चर्चा असून सोन्याच्या वस्तर्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांनी रुबाब सलूनमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अविनाश बोरूदिया यांनी दोन तरुणांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलून आळंदीत सुरू केले असून त्याला प्रचंड प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत आहे.
आळंदीत सोन्याच्या वस्तर्याची चर्चा असून अविनाश बोरुदिया या व्यवसायिकाने विक्की वाघमारे आणि युवराज कोळेकर यांना सोबत घेऊन रुबाब नावाचे सलून सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार, दुकानाच्या नावाप्रमाणेच काहीतरी वेगळे सलूनमध्ये करण्याचे ठरले.
भारतीय संस्कृतीत सोन्याच्या धातूला महत्व असून सोन्याच्या धातूपासून वस्तरा करण्याचे निश्चित झाले. अस अविनाश यांनी सांगितले. त्यांनी राजस्थान येथील विशेष कारागिरांकडून ४ लाख रुपये खर्च करून ८ तोळे सोन्याचा वस्तरा बनवून घेतला. रुबाब सलूनचे धडाक्यात उद््घाटन करण्यात आले आणि सोन्याच्या वस्तर्याने दाढी करण्यास सुरुवात केली. ते देखील सर्व सामान्य नागरिकांना परवडेल या दरात. सध्या या वस्तर्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली असून शंभर रुपयांना सोन्याचा वस्तर्याने दाढी केली जात आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे सलूनच्या नावाप्रमाणेच सध्या ग्राहकांचा रुबाब पाहायला मिळत आहे.
शंभर रुपयांमध्ये सोन्याच्या वस्तर्याने दाढी !
Contents hide