दोस्तांनो, आता तुम्हाला प्रेमाच्या दिवसाचे वेध लागले असतील. लाल रंगात माखून निघण्याचे मनसुबे तुम्ही रचत असाल. व्हॅलेंटाईन डे लाच नव्हे तर या संपूर्ण आठवड्यात लाल रंगाला मागणी असते. तुम्हीही या रंगाचे कपडे घालण्याचा विचार करत असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
लाल रंग स्मार्ट पद्धतीने कॅरी करायचा असेल तर ‘पुलिंग ऑफ जंपर्स’ हा साधा आणि सोपा पर्याय आहे. यात गडद आणि भडक लाल रंगांची निवड करा. त्यासोबत घातल्या जाणार्या ज्ॉकेट किंवा पँटमुळे हा भडकपणा कमी होतो. लाल फ्लॅनेल्स हा सुद्धा हटके पर्याय आहे. रेड थीम असणार्या पाटर्य़ांना तुम्ही फ्लॅनेल्स घालू शकता. ऑल रेड लूक नको असेल तर फ्लॅनेल्स बेस्ट ठरतात. लेअरिंगचं तंत्र कधीही आउटडेटेड होत नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही रेड लूक खुलवू शकता. बॉम्बर ज्ॉकेट्स, स्कार्फ, नीट्स, स्नीकर्स अशा पर्यायांचा वापर करून लेअरिंग करा आणि हॉट दिसा. मिक्स अँण्ड मॅच टेक्श्चर्स, पिंट्र्स आणि रंगांचा मेळ साधा. प्रयोग करायला आवडत असेल तर लाल ट्राउझर्स कॅरी करता येतील. लाल ट्राउझर्ससाठी वेगळ्या फॅब्रिक्सची निवड करा. त्यावर ओव्हर साईज लाँग कोट घाला.
व्हॅलेंटाईन डे साजरा करताना..
Contents hide