• Sat. Jun 3rd, 2023

विनोद मेहरांच्या मुलीचा महत्त्वाचा निर्णय; बॉलिवूडला करणार रामराम?

ByGaurav Prakashan

Feb 4, 2021

मुंबई: दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांची मुलगी सोनियाने बॉलिवूड सोडलं अशा चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. नुकाताच सोनियाने मराध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत सोनियाने सध्या सुरु असलेल्या चर्चांवर वक्तव्य केले आहे.
मी आता बॉलीवूडचा भाग नाही असा निर्णय कोणी घेतला हे मला माहिती नाही. मी नुकतीच दुबईला शिफ्ट झाली आहे. लंडन, भारत आणि केनिया दरम्यानचा हा एक केंद्रबिंदू आहे. मी बर्‍याचदा लंडन आणि केनियाला जात असते. माझे बालपण या दोन देशांमध्ये गेलं आहे असे सोनिया म्हणाली.
पुढे ती म्हणाली, माझ्या वाटेत आलेल्या कोणत्याच गोष्टीचा राग मला आला नाही. खरं तर मी प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी यासाठी सगळं काही केलं मात्र दुदैर्वाने मला ते मिळालं नाही. आपल्याला मनासारखी भूमिका मिळणे हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, कोणत्याही भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास मी अगदी मनापासून तयार आहे. खरं तर भारतातील अनेक चित्रपट निर्मात्यांच्या मी संपर्कात आहे. मला केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक कलाकार म्हणून काम केल्याचे समाधान पाहिजे.
पुढे ती तिच्या साखरपुड्या बद्ल ही बोलली, माझा साखरपुडा झाला असून मी बॉलिवूड सोडले नाही. सोनियाच्या होणार्‍या नवर्‍याचे नाव कुणाल आहे. ते दोघे गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. नुकताच त्यांच्या साखरपुड्याला १ वर्ष झाले आहे. विनोद मेहरा यांच्या निधनानंतर सोनिया तिच्या आजी-आजोबांकडे केनियाला राहत होती. सोनियाचं शिक्षण केनिया आणि लंडनला झाले आहे. सोनिया वयाच्या ८ वर्षांची असल्यापासून अभिनयाचे धडे घेत होती. दरम्यान लंडन अँकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रामाटिक आर्ट्सच्या अभिनयच्या परीक्षेत तिला गोल्ड मेडल मिळालं होतं. १७ वर्षांची असताना ती मुंबईत आली आणि तिने अभिनेता अनुपम खैर यांच्या इंस्टीट्यूटमधून ३ महिन्याचे प्रशिक्षण घेतले. सोनिया अभिनेत्री सोबतच एक ट्रेंड डान्सर आणि योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. सोनियाने श्ॉडो, एक मैं और एक तू, आणि रागिनी एमएमएस २ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *