• Fri. Jun 9th, 2023

वाढवा मुलांचा आत्मविश्‍वास…

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

खोड्या करणं हा लहानग्यांचा स्वभावधर्म असतो. काही मुलं तर अत्यंत खट्याळ आणि खोडकर असतात. पण हीच मुलं पाहुण्यांसमोर बुजल्यासारखं करतात. गप्प राहतात. अशा वेळी मुलांचा आत्मविश्‍वास कमी होत असल्याचं ओळखावं. त्यांचा बुजरेपणा दूर करण्यासाठी पुढील टिप्स उपयोगी पडतील.
बुजरेपणा दूर करण्यासाठी मुलांशी सहजतेने वागण्याचा प्रयत्न करा. त्यांना समवयस्कांमध्ये मिसळण्यासाठी उद्युक्त करा. सार्वजनिक ठिकाणं, गर्दीची ठिकाणं या सर्वांची त्यांना सवय होऊ द्या. मुलाच्या मनात ठराविक परिचतांबद्दल भीती असेल तर त्या व्यक्तीला भेटण्याची जबरदस्ती करू नका. त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरी पाहुणो येणार असतील तर मुलाला प्रत्येक पाहुण्यांविषयी नावानिशी सांगा. त्यामुळे त्याला पाहुणो अनोळखी वाटणार नाहीत. पाहुणो आल्यावर परत एकदा त्यांची ओळख करून द्या. यामुळे मुलांचा आत्मविश्‍वास वाढेल. मुलांमध्ये अतिभयामुळे किंवा सतत एकटं राहिल्याने सोशल एंग्झायटी निर्माण होण्याची शक्यता असते. हा बुजरेपणा अधिक असल्यास चाईल्ड कौन्सिलरची मदत घ्यावी. त्यांना आत्मनिर्भर बनवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *