• Tue. Jun 6th, 2023

वयात काय ठेवले! मराठमोळ्या नम्रताने ३ वर्षांनी लहान महेश बाबूसोबत केले होते लग्न !

ByGaurav Prakashan

Feb 11, 2021

नवी दिल्ली : अनेक अभिनेत्रींनी आपल्या वयापेक्षा बर्‍याच मोठय़ा असणार्‍या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधली. तर काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या आपल्या पार्टनरपेक्षा वयाने लहान आहेत. यापैकी एक मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर. तिने आपल्यापेक्षा वयाने ३ वर्षांनी लहान असणार्‍या साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्नगाठ बांधली.
बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांचा आज लग्नाचा १६ वा वाढदिवस आहे. नम्रताचा जन्म २२ जानेवारी, १९७२ रोजी मुंबईमध्ये झाला होता. तर ९ ऑगस्ट, १९७५ रोजी महेश बाबूची जन्म तारीख आहे. दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीचे तेलुगू सुपरस्टार महेश बाबू आज आपला लग्नाचा १६ वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूने १0 फेब्रुवारी, २00५ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले होते. या औचित्याने महेशने नम्रताला हटके अंदाजात विश केलं आहे. खास म्हणजे, महेशने जी पोस्ट शेअर केली आहे, अवघ्या काही क्षणात लाखो चाहत्यांनी लाईक केलं आहे.

महेश तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार आहे. उत्तम अभिनय आणि हिट चित्रपटांनी त्याने हिंदी प्रेक्षकांमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. त्याने २000 मध्ये चित्रपट ह्यवामसीमधू नम्रता शिरोडकर सोबत काम केले होत. या चित्रपटातून दोघांमध्ये जवळीक वाढली. जवळपास ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २00५ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले गौतम आणि सितारा आहेत. २00६ मध्ये महेश बाबू आणि नम्रताने मुलाला (गौतम) आणि २0 जुलैला, २0१२ रोजी मुलगी (सितारा) ला जन्म दिला होता. आज लाईमलाईटपासून दूर राहणारी नम्रताने १९९३ मध्ये ह्यफेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावे केला होता. त्यानंतर, तिने सलमान खानसोबत आपला पहिला चित्रपट केला होता. हा किताब मिळवल्यानंतर नम्रता येथेच थांबली नाही. तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली. परंतु, तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. नम्रताने आपल्या करिअरची सुरुवात १९९३ मध्ये मॉडलिंगमधून केली होती. मॉडलिंगनंतर नम्रताने पूरब की लैला, पश्‍चिम का छैला चित्रपट साईन केला होता, परंतु हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. त्यानंतर, तिने सलमान खानचा चित्रपट जब प्यार किसी से होता हैमधून डेब्यू केला होता. यामध्ये तिने एक छोटीसी भूमिका साकारली होती. नम्रता पहिल्यांदा स्विम सूट घालून मोठय़ा पडद्यावर आला होती, तेव्हा ती चर्चेत आली होती. खरंतरं, नम्रताला खरी ओळख मिळाली ती चित्रपट ह्यवास्तवमधून. या चित्रपटामध्ये ती संयज दत्तसोबत मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट सुपरहिट होती. हिंदीसोबतच नम्रताने कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने ह्यपुकार, ह्यहेराफेरी, ह्यअस्तित्व ह्यकच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे आणि ह्यएलओसी कारगिल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. नम्रता शिरोडकरची मोठी बहिण शिल्पा शिरोडकर प्रसिध्द अभिनेत्री आहे. नम्रताची आजी मीनाक्षी यादेखील प्रसिध्द अभिनेत्री होत्या. महेशने १९७९ मध्ये रिलीज झालेला चित्रपट फिल्साम नीडामध्ये एक बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. जवळपास ८ चित्रपटांमध्ये त्याने बाल कलाकार म्हमून काम केलं. राजाकुमरुडू (१९९९) चित्रपटा मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. चित्रपट ह्यमुरारी (२00१), ह्यओक्काडू (२00३), ह्यअथाडु (२00५), ह्यपोकिरी (२00६) असे हिट चित्रपट दिले. ननेक्कोडाइन (२0१४), सरिमंथुडू (२0१५), दूकुडू (२0११), व्यापारी (२0१२), सीथम्मा वकितलो सरिमल्ले चेट्टू (२0१३) असे व्यावसायिक चित्रपट केले.
आजपयर्ंत त्याने सात नंदी पुरस्कार, पाच फिल्मफेयर पुरस्कार, तीन सिनेमा पुरस्कार, तीन दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार आपल्या नावे त्याने केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *